BAMS (Buddhist Ambedkarite Maitri Sangh)- UK, Celebrates 131st Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar in Cambridge UK. - GLOBAL AMBEDKARITES

Trending

Friday, April 29, 2022

BAMS (Buddhist Ambedkarite Maitri Sangh)- UK, Celebrates 131st Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar in Cambridge UK.


Dr. B. R. Ambedkar, the polymath and emancipator of millions of Indians, his birth anniversary is celebrated on the 14th April all around the world. The Ambedkar Jayanti or Bhim Jayanti as it is referred, was organized by Buddhist Ambedkarite Maitry Sangh, UK on 23rd April, 2022 at the Cambridge Buddhist Center in Cambridge, United Kingdom.

On the occasion of the 195th birth anniversary of Krantisurya Mahatma Jyotiba Phule and 131st birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar, various programmes were organized. These included impressive performances of short plays, dance, povada (ballard), bhim songs, poetry reading and playing musical instruments. These performances depicted events based on the lives of great Indian icons, Dr. Ambedkar, Mahatma Jyotiba Phule, Emperor Asoka, Rajashri Shahu Maharaj and Chatrapati Shivaji Maharaj.

The Buddhist Ambedkarite Maitry Sangha is a family oriented, non-political organization based in the United Kingdom that strives to preserve member’s cultural and ideological heritage by bringing together families living in the region. The organization strives to create an Ambedkarite and Buddhist social and cultural forum in the UK.


The occasion of the jubilee event provided a platform for the young and old to present their skills. Taking advantage of the opportunity, a large number of children participated in various programs and showed their talents. Even while living in the United Kingdom, the Buddha Dhamma, Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Jyotiba Phule, Chhatrapati Shahu ji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj, along with the invaluable ideology of great people are inculcating in our children.

The program started with recitation of Buddha Vandana. After paying homage to Mahamanavan, the vihara resounded with the chanting of Jayabhim. The event was attended by families and friends from all over the United Kingdom. Many came from as far as from Scotland and Wales, parts of the United Kingdom.

For hundreds of years, bahunjans had to live the undignified life, but because of Dr. Babasaheb Ambedkar, now they have got opportunities to contribute to the society as per their own ability and merit. Many doctors, engineers, businessmen, professionals, PhD holders settled across the seas joined singing 'Uddharli Kati Kule Bhima Tujha Janmamule'. They are spreading the ideas of Dr. Babasaheb Ambedkar and other great men as a responsibility of the society.

Officials from the "Cambridge Buddhist Center" in Cambridge also made their vihara available for the event without any delay. The Cambridge Buddhist Monastery regularly hosts a variety of events, they were very happy to include an important cultural event such as "Bhim Jayanti 2022".


भिमजयंती केंब्रिज, युकेमध्ये  जल्लोषात साजरी 

 

माणसाला माणसात आणणार्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आली. त्यापैकी "बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, UK (BAMS UK)" द्वारा आयोजित "जयंती 2022" हा कार्यक्रम युनायटेड किंगडम येथील केंब्रिजच्या "केंब्रिज बुद्धिस्ट सेंटर" येथे 23 एप्रिल 2022 दिनी हर्षउल्हासाने साजरा करण्यात आला.

क्रान्तिसुर्य महात्मा फुले यांच्या 195 व्या आणि

भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक, राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित घटनांवर लघु नाटकं, नृत्यं, पोवाडे, भीम गीते, कविता वाचन आणि वाद्यवादन हयांचे प्रभावी सादरीकरण झाले.

 

बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, UK चा प्रयत्न हा नेहमी लहान मुलांना आंबेडकरी आणि बुद्ध धम्माचे संस्कार आणि परंपरा देण्याचा असतो. बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, यूके मध्ये आंबेडकरी आणि बुद्धिस्ट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच निर्माण करण्यात प्रयत्नशील आहे. जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समजातील लहान, मोठे यांना त्यांचे कौशल्य सादर करण्यास मंच उपलब्ध  झाला. संधीचे सोने करत लहान मुलांनी मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली.

युनायटेड किंगडम मध्ये राहून देखिल बुध्द धम्म , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू जी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, यांच्यासह महामानवांची अमुल्य विचारधारा आपल्या मुलांमध्ये रुजवत आहेत हे विशेष.

 

ही संघटना युनाइटेड किंग्डम येथील कौटुंबिक संघटन असून येथे राहणाऱ्या कुटुंबाना एकत्र आणून आपला सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न सातत्याने करते, त्याचवेळी कोणत्याही राजकीय संघटनांपासून अलिप्त आहे.

 

कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना पासून झाली आणि महामानवांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर जयभीम च्या जयघोषाने संपूर्ण विहार निनादून गेले.

या कार्यक्रमासाठी युनायटेड किंग्डम च्या विविध भागातून लोकं आले होते. भरपूर लोकं स्कॉटलंड आणि वेल्स ह्या युनायटेड किंग्डम मधील देशांतून सुद्धा आले होते.

 

बहुजनांना शेकडाे वर्षे गुलामीत जाेखडबंद ठेवले हाेते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच त्यांना त्यांच्या गुणवत्तेत प्रमाणे काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणूनचउद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळेम्हणत अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, पीएचडी होल्डर्स सातासमुद्रापार जाऊन प्रस्थापित झालेत आणि समाजाचे उत्तरदायित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांचे विचार पसरवित आहेत.

 

केंब्रिज मधल्या "केंब्रिज बुद्धिस्ट सेंटर" च्या पदाधिकाऱ्यांनी देखील काहीही विलंब लावता आपले विहार या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले. केंब्रिज बुद्धिस्ट विहारामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यात "भीमजयंती 2022" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले यामुळे पदाधिकारी आनंदात होते. याचवेळी पुस्तकवाचनाची परंपरा कायम ठेवत जमलेल्या लोकांनी पुस्तक प्रदर्शनातून ,वसंतराव कृष्णाजी साळवे लिखित "बुद्ध धर्माचे सार( Marathi translation of Essence of Buddhism") मोतीलाल आलमचंद्र लिखित "साँची दानंपुस्तके विकत घेतली. त्यातून मिळालेले पैसे केम्ब्रिज विहाराला दान म्हणून देण्यात आले.









No comments:

Post a Comment